T20 World Cup 2024 & Indian Cricket Team Schedule : आयपीएल 2024 संपले. रविवारी, 26 मे रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात स्पर्धेचा अंतिम सामना झाला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली केकेआरने विजयाची पताका फडकवत ट्रॉफी जिंकली. आता आयपीएल संपल्यानंतर टी-20 विश्वचषकाचा थरार सुरू होणार आहे, ज्यासाठी टीम इंडियाचे जवळपास सर्व खेळाडू अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये पोहोचले आहेत. फक्त 2-3 खेळाडू अजूनही भारतात आहेत.
✈️ Touchdown New York! 🇺🇸👋#TeamIndia 🇮🇳 have arrived for the #T20WorldCup 😎 pic.twitter.com/3aBla48S6T
— BCCI (@BCCI) May 27, 2024
अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे टी-20 विश्वचषक स्पर्धा 1 जूनपासून सुरू होणार आहे. मात्र वेळेतील फरकामुळे भारतातील ही स्पर्धा 2 जूनपासून सुरू होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या स्पर्धेच्या अ गटात आहे, ज्यामध्ये भारताव्यतिरिक्त अमेरिका, कॅनडा, पाकिस्तान आणि आयर्लंडचाही समावेश आहे. टीम इंडिया ग्रुप स्टेजचे सर्व सामने अमेरिकेतच खेळणार आहे.
टीम इंडिया बुधवार, 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध टी-20 विश्वचषकातील पहिला सामना खेळणार आहे. यानंतर टीम इंडियाचा दुसरा सामना रविवारी 9 जून रोजी पाकिस्तानशी होणार आहे. हे दोन्ही सामने न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत.
टीम इंडियाचे टी20 वर्ल्ड कपचे वेळापत्रक –
पहिला सामना 05 जून, बुधवार – भारत विरुद्ध आयर्लंड – (नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क)
दुसरा सामना 09 जून, रविवार – भारत विरुद्ध पाकिस्तान – (नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क)
तिसरा सामना, बुधवार, 12 जून – भारत विरुद्ध यूएसए – (नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क)
चौथा सामना, 15 जून, शनिवार – भारत विरुद्ध कॅनडा – (सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा)
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 30 एप्रिल रोजी टी20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली होती. रोहित शर्माला संघाचा कर्णधार आणि हार्दिक पांड्याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. 15 सदस्यीय संघाशिवाय 4 राखीव खेळाडूंचीही घोषणा करण्यात आली.
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ – रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र सिंग चहल, अरविंद चहल जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
राखीव – शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान.