नवी दिल्ली – कोर्बेव्हॅक्स या करोना लसीचे पाच कोटी डोस केंद्र सरकार खरेदी करणार आहे त्याचे आदेश दिले असल्याची माहिती केंद्र सरकारच्या सूत्रांनी दिली.
या लसीचे लाभार्थी कोण असतील, सरकारने अद्याप निश्चित केले नाही. मात्र, आघाडीचे योध्दे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना या लसीचा बुस्टर डोस देण्याबाबत आरोग्य मंत्रालय आणि तांत्रिक सल्लागार यांच्यात सुरू असल्याचे सूत्रांनी संगितले.
एचएलएल लाईफ केअर लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला ही लस खरेदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रती मात्रा 145 रुपये अधिक जीएसटी इतक्या रकमेला ही खरेदी होणार आहे. त्यामुळे या खरेदीसाठी एक हजार 500 कोटी रुपयांची उचल पाच जून 2021 रोजी देण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.