बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या नावे आणखी एका कामगिरीची नोंद करण्यात आली आहे. हे कोणत्या चित्रपटाच्या यशाबाबत नाही. दीपिका पदुकोणला अथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या एका प्रदर्शनात फीचर करण्यात आले. या प्रदर्शनाचे “द ऑथेंटिक स्माइल्स ऑफ द वर्ल्ड ऑफ पीपल्स’ असे नाव आहे.
View this post on Instagram
करोना संक्रमणानंतर अथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे स्वागत करण्यासाठी ऑथेंटिक स्माइल्स प्रदर्शन सुरू करण्यात आले आहे. तसेच अथेन्स येथे दीपिकाचा एक संगमरवरी पुतळादेखील बसविण्यात आला आहे. या पुतळ्याखाली असे लिहिण्यात आले आहे की, “भारतीय बॉलीवूड अभिनेत्री अथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळावर हसताना दिसली. ग्रे मार्बल, 2020 ए.डी.’ तसेच लंडनमधील मॅडम तुसॉं वॅक्स म्युझियममध्येदेखील दीपिका पदुकोणचा मेणाचा पुतळा आहे.
View this post on Instagram
दरम्यान, दीपिका पदुकोणसह अनेक भारतीय कलाकारांच्या मूर्ती तेथे अस्तित्वात आहेत. या पुतळ्या वेगवेगळ्या वस्तूंनी बनविल्या आहेत, जसे काही पांढरे संगमरवरी आणि काही लाकडापासून बनविलेले आहेत. विशेष म्हणजे अनेक सुंदर चेहऱ्यांमध्ये दीपिकाचादेखील समावेश आहे. दीपिकाने आपल्या दमदार अभिनयातून असंख्य चाहत्यांवर आपली छाप सोडली असून तिचे हास्यदेखील प्रत्येक चाहत्याच्या मनात रुजलेले आहे.
View this post on Instagram