सासवड (प्रतिनिधी) – पुरंदर तालुक्यातील सासवड येथील कस्तुरबा ट्रस्टच्या व्यवस्थापिका शेवंता चव्हाण यांना कस्तुरबा ट्रस्टच्या माध्यमातून अनेक अनाथ मुलींना आधार देऊन त्यांना शिक्षण शिक्षणाबरोबर व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना आपल्या पायावर सक्षमपणे उभे केले.
म्हणून सातारच्या ध्यास फाउंडेशनच्या वतीने दीपस्तंभ नारी पुरस्कार देऊन त्यांचा ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र माने यांच्या हस्ते 17 मार्च रोजी सन्मान करण्यात आले.
यावेळी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रा. डॉ. वैजयंता ओतारी, सचिव सचिन कांबळे, सदस्य चंद्रकांत जाधव, अॅड. सुरेश रुपनवर आदी उपस्थित होते.