जामीन मिळाल्यानंतर दीप सिंधूला पुन्हा अटक

नवी दिल्ली – लाल किल्ला हिंसाचारप्रकरणी जामीन मिळालेला अभिनेता आणि कार्यकर्ता दीप सिंधू याला आज पुन्हा अटक करण्यात आली. भारतीय पुरातत्व खात्याने दाखल केलेल्या एफआयआर प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्‍टर परेड दरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप या एफआयआरमध्ये आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लाल किल्ल्‌यावरील हिंसाचारप्रकरणी दीप सिंधू याला 9 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती आणि दोनच दिवसापूर्वी त्याला जामीनही मंजूर झाला आहे. अटक झाल्यापासून 14 दिवस तो पोलीस कोठडीत होता असेही न्यायालयाने म्हटले आहे.

दीप सिंधू याच्या आवाजाच्या नमुन्यासाठी अधिक चौकशी करण्याची पोलिसांची मागणी न्यायालयाने अमान्य केली आहे. जामीन मंजूर करताना न्यायालयाने दीप सिंधू झाला पासपोर्ट जमा करण्याचे तसेच आवश्‍यकता भासेल तेव्हा पोलीस स्थानकात आणि न्यायालयात हजर राहण्याचे निर्देशही दिले आहेत.

26 जानेवारीला हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीतील आयटीओ येथे ट्रॅक्‍टर रॅली काढली होती. या शेतकऱ्यांचा पोलिसांबरोबर संघर्षही झाला होता. लाल किल्ल्‌यावर या शेतकऱ्यांनी धार्मिक ध्वज फडकवला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.