नवी दिल्ली – बऱ्याच गुंतवणूकदारांनी नफा काढून घेण्यासाठी सोन्याची विक्री केल्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी झाले. त्या प्रमाणात भारतीय बाजारातही सोन्याचे दर कमी झाले.
दिल्ली सराफात सोन्याचा 280 रुपयांनी कमी होऊन 46,657 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर मात्र 212 रुपयांनी वाढून 61,337 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,775 डॉलर व चांदीचा दर 22.33 डॉलर प्रति औंस झाला.