जम्मू : काश्मीरचे शेवटचे डोग्रा राजे महाराजा हरिसिंग यांच्या नावाने सरकारने त्यांच्या जयंतीच्या दिवशी या राज्यात सरकारी सुट्टी जाहीर करावी अशी मागणी जम्मू काश्मीर कॉंग्रेसने केली आहे. सरकारने सन 2020 वर्षाच्या सरकारी सुट्ट्या जाहीर केल्या.
पण जम्मू काश्मीर कॉंग्रेसने गेल्यावर्षी मागणी करून सुद्धा त्याचा विचार केला गेला नाही म्हणून कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी हरिसिंग यांच्या स्मारकापाशी आज निदर्शने केली. कॉंग्रेसच्या या मागणीला नॅशनल पॅंथर्स पार्टी आणि अन्य सामाजिक संघटनांनीही पाठिंबा दिला आहे.
जम्मू काश्मीरात वर्षभरात एकूण 27 सरकारी सुट्ट्या जाहींर करण्यात आल्या आहेत. त्यात 13 जुलै रोजी साजरा केला जाणारा हुतात्मा दिन आणि शेख अब्दुल्लांच्या जयंती दिनी असलेल्या एकूण दोन सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.