आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षातर्फे आज आपला जाहीरनामा सादर करण्यात आला आहे. दरम्यान काँग्रेसतर्फे आज जाहीर करण्यात आलेल्या जाहीरनाम्यावर सत्ताधारी भाजप नेत्यांनी हल्ला चढवला असून भाजपतर्फे काँग्रेसचा हा जाहीरनामा देशाचे तुकडे करणारा असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी देखील काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर हल्ला चढवला असून ते म्हणतात, “मी काँग्रेस अध्यक्षांना एक प्रश्न विचारू इच्छितो, काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यामध्ये सैनिकांना देण्यात आलेला विशेष अधिकारांच्या कायद्यामध्ये (AFSPA) बदल करण्याचे आश्वासन दिले आहे. अशा आश्वासनाद्वारे काँग्रेस देशाच्या सीमेवर लढत असलेल्या सैनिकांचे ‘बल’ वाढवत आहे की त्यांचे ‘मनोबल’ घटवत आहे?”
BJP President Amit Shah on Congress party in its election manifesto promising to amend Armed Forces (Special Powers) Act-AFSPA: Main poochna chahta hun Congress adhyaksh ko, jo jawan desh ki seema par larh rahe hain, unko aap bal dena chahte ho ya unka manobal girana chahte ho? pic.twitter.com/sBhITyupcS
— ANI (@ANI) April 2, 2019