पुणे: पती-पत्नीने एकाची साडे चार कोटीची फसवणूक केली. धंद्यामध्ये 50 टक्के फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते.
बकुल पुनीत जैन उर्फ बकुल सिंग(35,रा.कल्याणीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार निलेश सिंग व मीनाक्षी सिंग(47,रा.तालेरा पार्क, कल्याणीनगर) यांच्याविरुध्द कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी या खासगी कंपनीमध्ये टेक्नीकल आर्किटेक्चर म्हणून काम पहातात तर त्यांच्या पतीची बावधान येथे कंपनी असून ते सीव्हील कॉन्टॅक्टर म्हणूनही कामकाज पहातात. त्यांना प्रॉपर्टीज प्रा.लि. चे संचालक व त्यांची पत्नी यांना ओळखीतून स्वत:च्या कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगून त्या रकमेवर 50 टक्के फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. यानंतर फिर्यादी व त्यांच्या पतीने 1 कोटी 76 हजार रुपये गुंतवले. त्यांना फाद्याप्रमाणे आजवर 4 कोटी 30 लाख 44 हजार तसेच त्यांच्या पतीने विविध साईटवर केलेल्या कामाचे 23 लाख असे मिळून 4 कोटी 53 लाख 44 हजार रुपयांची आरोपींनी फसवणूक केली आहे. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बहाद्दरपुरे करत आहेत.