सातारा – कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल असणाऱ्या करोना बाधित पुरुषांचा पहाटे म्रुत्यू झाला.५४ वर्षे पुरुष या कोरोना (कोविड-१९) बाधित रुग्णांचा आज पहाटे ५ वाजता मृत्यु झाला आहे.कोरोना बाधित ५४ वर्षीय पुरुषाचा मृत्यू हा प्राथमिक अंदाजानुसार कोविड-१९ सह श्वसन संस्थेच्या जंतू संसर्गामुळे आणि मधुमेहामुळे झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
दरम्यान, हा रुग्ण मुंबई येथे मत्स्य व्यवसाय करीत होता. तो 21 मार्च रोजी त्याच्या गावी आला. दि.30 मार्च रोजी त्याला खोकल्याचा त्रास सुरु झाला. 5 एप्रिल रोजी कृष्णा हॉस्पिटल, कराड दाखल करण्यात आले. 6 एप्रिल रोजी त्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना घेण्यात आला होता व अहवालानुसार दि.7 एप्रिल रोजी हा रुग्ण कोविड-19 बाधित पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.