दाऊदचे नेटवर्क आतंकवाद्यांना कामी येते आहे – भारत

संयुक्त राष्ट्राकडे भारताची पुन्हा तक्रार

संयुक्त राष्ट्रे – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा सध्या पाकिस्तानातच असून त्याचे अंडरवर्ल्डमधिल नेटवर्क आता दहशतवाद्यांच्या कामी येत असून भविष्यात त्यामुळे भारताला मोठा धोका संभवतो असे म्हणत भारताने संयुक्त राष्ट्रात पुन्हा एकदा दाऊद व पाकिस्तानाची तक्रार केली आहे.

भारताचे संयुक्त राष्ट्रातील प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी आज अमेरिकन सुरक्षा परिषदेसमोर या संदर्भात आपली भुमिका मांडताना सांगितले की, दहशतवादी संघटना दाऊद इब्राहिमचे भारतातील आणि अन्य देशांमधील नेटवर्कचा वापर आपल्या संघटनांसाठी निधी जमा करण्यासाठी करत असून ते पैसे खंडणी, मानवी तस्करी आणि दहशतवादी कारवायांसाठी वापरत आहेत. त्यामुळे भविष्यात भारतच नाही तर इतर देशांनाही याचा फटका बसण्याची शक्‍यता आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

तसेच यावेळी त्यांनी सांगितले की, दाऊद इब्राहीमच्या डी कंपनीचे जाळे हे अनेक देशांमध्ये पसरलेले असले तरी त्याचा सर्वाधीक प्रभाव हा भारतात आहे. त्यामुळे त्याच्या डी कंपनीने दहशतवादी संघंटनांशी केलेल्या हातमिळवणीचा सर्वाधीक फटका हा भारताला बसण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी.

Leave A Reply

Your email address will not be published.