Ranji Trophy – देशांतर्गत क्रिकेटमध्ये अत्यंत महत्वाची मानली जाणारी रणजी करंडक स्पर्धा सुरु झाली आहे. या स्पर्धेमुळे अनेक खेळाडूंना देशासाठी तसेच आयपीएल सारख्या स्पर्धेमध्ये खेळण्याचे स्वप्न पूर्ण होते. त्यामुळे प्रत्येक खेळाडू आपापल्या संघांकडून खेळताना पूर्णपणे योगदान देतात. या स्पर्धेमुळे अनेक खेळाडू दमदार कामगिरी करत आपल्याकडे लक्ष वेधून घेत असतात.
मुंबई इंडियन्सने १७.५ कोटी रुपयांना घेतलेला खेळाडू सामना सुरु असतानाच रुग्णालयात
दरम्यान, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यात उत्तराखंड संघाचा युवा वेगवान गोलंदाज दीपक धपोला याने आपल्या गोलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सामन्याच्या सुरुवातीला हिमाचल प्रदेश संघाचा कर्णधार रिषी धवनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
मुंबई इंडियन्सने १७.५ कोटी रुपयांना घेतलेला खेळाडू सामना सुरु असतानाच रुग्णालयात
मात्र, हिमाचलच्या कर्णधाराचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला आणि संपूर्ण संघ अवघ्या ४९ धावांतच गारद झाला. उत्तराखंड संघाच्या दीपक धपोलाने जबरदस्त कामगिरी करत ८.३ षटकांत ३५ धावा खर्च करून ८ गडी बाद केले. हिमाचलच्या अंकित कलसी (२६ धावा) यांच्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला धावांचा दुहेरी आकडादेखील गाठता आला नाही. संघाचे ५ फलंदाज तर भोपळाही फोडू शकले नाहीत.
हिमाचल प्रदेशच्या ४९ धावांच्या प्रत्युत्तरात उत्तराखंड संघाने पहिल्या दिवसअखेर ६ गडी गमावून २९५ धावा केल्या आहेत. संघाचा आदित्य तरे ९१ धावांवर नाबाद आहे तर त्याच्यासोबत अभय नेगी हा ४८ धावांवर नाबाद आहे. अगोदर गोलंदाजीत दीपक धपोलाने ८ गडी बाद केले आणि त्यानंतर फलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे उत्तराखंड सध्या पहिल्या डावात २४६ धावांनी आघाडीवर आहे.
Stumps Day 1: Uttarakhand – 295/6 in 64.6 overs (Aditya Tare 91 off 117, Abhay Negi 48 off 74) #CAUvHP #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 27, 2022