“धाकड’मधील दिव्या दत्ताचा धोकादायक लूक रिलीज

धाकडमधील कंगना रणावत आणि अर्जुन रामपाल यांचे लूक रिलीज झाले आहेत. आता दिव्या दत्तानेही तिचा या सिनेमातील एक अफलातून लूक रिलीज केला आहे. या सिनेमातील तिच्या व्यक्तिरेखेचे नाव रोहिणी असणार आहे आणि ती अतिशय धोकादायक असणार आहे, असेही दिव्याने ट्विटरवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. मात्र, ती किती धोकादायक असणार आहे, हे मात्र तिने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केलेले नाही.

या फोटोमध्ये दिव्या सोनेरी किनार असलेल्या हिरव्या साडीमध्ये बसलेली दिसते आहे. ती ज्या पद्धतीने बसली आहे, ते पाहता ती एखाद्या सिंहासनावर बसल्यासारखी दिसते आहे. दिव्याचा एकंदर अवतार पाहता ती या सिनेमातील खलनायिका असणार असेच वाटते आहे. एखाद्या अंडरवर्ल्ड गॅंगची लीडर वाटावी, असाच तिचा गेटअप आहे.

“धाकड’ या वर्षी 21 ऑक्‍टोबरला रिलीज होणार आहे. “धाकड’मधील अर्जुन रामपाल आणि कंगना रणावत यांचे लूक मंगळवारीच रिलीज झाले आहेत. अर्थातच कंगनाच या सिनेमाच्या लीड रोलमध्ये असणार आहे. ती एका ऑफिसरच्या रोलमध्ये दिसणार आहे. बालकांची तस्करी आणि महिलांवरील अत्याचाराच्या विरोधातील लढा असे या सिनेमाचे मुख्य सूत्र असणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.