रहिमतपूर पालिकेच्या विषय समिती सभापतींच्या निवडी बिनविरोध

रहिमतपूर  – रहिमतपूर, ता. कोरेगाव नगरपालिकेच्या विषय समित्यांच्या सभापतींची निवड मंगळवारी (दि. 19) बिनविरोध झाली. पालिकेच्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेत प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी पीठासन अधिकारी म्हणून काम पाहिले.

नगराध्यक्ष स्थायी समितीचे पदसिद्ध सभापती असतात. बांधकाम समिती सभापतिपदी ज्योत्स्ना माने, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापतिपदी विद्याधर बाजारे, महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी सुजाता राऊत, उपसभापतिपदी पद्मा घोलप यांची निवड करण्यात आली.

नगराध्यक्ष आनंदा कोरे यांनी नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन केले. मुख्याधिकारी संजीवनी दळवी, उपनगराध्यक्ष सुरेखा माने, विरोधी पक्षनेते नीलेश माने, नगरसेवक बेदिल माने, चांदगणी आतार, रमेश माने, अनिल गायकवाड, सतीश भोसले उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.