डान्सिंग गुरुजींचा सोशल मीडियात बोलबाला

ओडिसा:  सध्या सोशल मिडिया हे असं माध्यम बनलं आहे की जे एका रात्रीतएखाद्याला स्टार बनवू शकते. त्याच उत्तम उदाहरण सर्वांनिच राणू मंडल यांच्या बाबतीत पहिले आहे. सोशल मीडियामुळे त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली असून त्या सध्या  इंटरनेट स्टार आहेत. त्यांच्या प्रमाणेच सध्या या सोशल मीडिया मध्ये एका गुरुजींचा बोलबाला आहे. त्यांचा एक व्हॉइडव व्हायरल झाला असून, नेटकाऱ्यानी त्यांना चांगलंच डोक्यावर घेतलं आहे.

व्हायरल व्हिडीओ हा ओडिशामधील प्रफुल्ल कुमार पाथी यांचा असून ते एका सरकारी शाळेत मुख्याध्यापक म्हणून नोकरी करत आहेत. त्यांची विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्दत तरुणाईला लाजवेल अशी आहे. चक्क नाचून शिक्षण देणारे हे गुरुजी आहेत. आणि त्यांच्या याच गोष्ट्टींची सर्वाना भुरळ पडली असून ते सध्या ‘इंटरनेट स्टार’ बनले आहेत

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×