नवी दिल्ली: माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची आयएनएक्स मीडिया प्रकरणात सध्या चौकशी सुरू असून त्यांची भारताबाहेर १० हुन अधिक देशात संपत्ती असल्याचा दावा ईडी ने केला आहे. चिदंबरम आणि आयएनएक्स मधील इतर आरोपीनी परदेशात संपत्ती विकणे आणि बँक खाती बंद केलेल्या पुराव्यांसोबत संशयास्पद बदल केले असल्याचे ईडी ने म्हटले आहे.
दरम्यान चिदंबरम यांच्या सीबीआय कोठडीची मुदत संपल्यानांतर त्यांना न्यायालयात हजार करण्यात आले होते. त्यांची कोठडी वाढून मिळण्याची मागणी करताना ईडी कडून ह्या दावा करण्यात आला आहे. चिदंबरम यांनी अनेक देशांत बँक खाते उघडली असून या खात्यांमध्ये अनेक व्यवहार झाले असल्याचे ईडीने म्हटले आहे.