अकलूज येथे दलितांचे लोटांगण आंदोलन

मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदारांनी स्वीकारले

अकलूज -येथे माळशिरस तालुका दलित महासंघाच्या वतीने आंबेडकर चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सदुभाऊ चौक मार्गे प्रांत कार्यालयावर नुकतेच लोटांगण आंदोलन करण्यात आले.

महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र सकटे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे दलित महासंघाचे पश्‍चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष राजाभाऊ खिलारे यांच्या उपस्थितीत, माळशिरस तालुका दलित महासंघाचे वतीने लोटांगण आंदोलन करण्यात आले.

यावेळी प्रांताधिकारी यांच्या वतीने नायब तहसीलदार बनसोडे यांनी निवेदन स्वीकारले. मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे, अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, संगमवाडी येथील लहुजी साळवे यांच्या स्मारकाला त्वरित विशेष अनुदान देऊन स्मारकाचे काम तातडीने चालू करावे, लहुजी वस्ताद साळवे व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे पुतळे मंत्रालयासमोर उभे करण्यात यावेत, लहुजी वस्ताद साळवे आयोगाच्या सर्व शिफारशी तातडीने लागू कराव्यात या मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

यावेळी दलित महासंघाचे पश्‍चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष राजाभाऊ खिलारे, पश्‍चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष केरबा लांडगे, तालुकाध्यक्ष धनाजी साठे, महिला अध्यक्षा रेखा खिलारे, नंदा लोखंडे, गणेश लांडगे, बच्चन साठे आदी यावेळी उपस्थित होते. त्यावेळी विविध सामाजिक संघटना, पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.