बर्मिंगहॅम – बॅडमिंटनच्या सलामीच्या सामन्यात भारतने पाकिस्तानवर 3-0 अशी अभेद्य आघाडी घेत पहिल्या दिवशी वर्चस्व राखले. मिश्र दुहेरीत बी सुमीथ रेड्डी आणि माचिमंदा पोनप्पा या भारतीय जोडीने नॅशनल एक्झिबिशन सेंटरमध्ये पाकिस्तानच्या मुहम्मद इरफान सईद भाटी आणि गझला सिद्दिकी या जोडीवर 21-9 21-12 असा सहज विजय मिळवून दमदार सुरुवात केली.
त्यानंतर पुरुष एकेरीच्या सामन्यात भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने मुराद अलीचा सहज पराभव केला. के. श्रीकांतने हा सामना 21-7, 21-12 असा जिंकला.
#CommonwealthGames | In Badminton,
* India beat Pakistan by 3-0 in opening group stage match of mix team event
* PV Sindhu beat Pakistan’s Mahoor Shahzad 21-7 21-6
* Kidambi Srikanth beat Pak’s Murad Ali 21-7 21-12
* Ashwini Ponappa/Sumeeth Reddy beat Pak pair 21-9 21-12 pic.twitter.com/1IyxMi7KVA
— ANI (@ANI) July 29, 2022
ही विजयी मालिका दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेत्या पी.व्ही. सिंधूने कायम राखली. महिला एकेरीत सिंधूने माहूर शहजादवर वर्चस्व गाजवित 21-7, 21-6 असा गुणफरकाने विजय मिळवला.