World Cup 2023 South Africa vs Afghanistan Match : विश्वचषक 2023 च्या 42व्या सामन्यात आज दक्षिण आफ्रिकेचा सामना अफगाणिस्तानशी होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. मात्र, गेल्या सामन्यात भारताविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. अशा स्थितीत संघ पुन्हा गती मिळविण्याचा प्रयत्न करेल.
त्याचवेळी अफगाणिस्तानचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर नसला तरी Semifinal मध्ये पोहचण्यासाठी त्यांच्यासाठी समीकरणे खूपच कठीण आहेत. अफगाणिस्तानला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 438 किंवा त्याहून अधिक धावांनी विजय मिळवावा लागेल.
SA vs AFG Live Score : अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत सर्व गडी गमावून 244 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेनं पाच विकेट गमावून 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे. दुसेन आणि फेहलुकवायो क्रीजवर आहेत. दोघांनाही आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा आहे. आफ्रिकन संघ विजयाच्या जवळ आहे.
दक्षिण आफ्रिकेला पाचवा धक्का…
दक्षिण आफ्रिकेची पाचवी विकेट 182 धावांवर पडली. डेव्हिड मिलर 33 चेंडूत 24 धावा करून बाद झाला. मोहम्मद नबीने त्याला त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले. दक्षिण आफ्रिकेची चौथी विकेट 139 धावांवर पडली. हेनरिक क्लासेन 13 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. राशिद खानने त्याला बोल्ड केले. दक्षिण आफ्रिकेची तिसरी विकेट 116 धावांवर पडली. एडन मार्कराम 32 चेंडूत 25 धावा करून बाद झाला. रशीद खानने त्याला नवीन उल हककरवी झेलबाद केले.
दोन्ही सलामीचे फलंदाज पॅव्हेलियनमध्ये
दक्षिण आफ्रिकेची दुसरी विकेट 66 धावांवर पडली. दोन्ही सलामीचे फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. क्विंटन डी कॉक 47 चेंडूत 41 धावा करून बाद झाला. मोहम्मद नबीने त्याला विकेट्ससमोर पायचीत केले. दक्षिण आफ्रिकेची पहिली विकेट 64 धावांवर पडली. कर्णधार टेंबा बावुमा 28 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. मुजीबने त्याला यष्टिरक्षक गुरबाजकडे झेलबाद केले.