हैदराबाद :- महंमद रिझवान व सौद सखिल यांची अर्धशतके तसेच अन्य फलंदाजांनी केलेल्या उपयुक्त फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने शुक्रवारी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत नेदरलॅंडसमोर विजयासाठी 287 धावा करण्याचे आव्हान ठेवले. नेदरलँड्सविरुद्ध पाकिस्तानचा संघ 49 षटकांत 286 धावांवर ऑलआऊट झाला.
नाणेफेक जिंकल्यावर नेदरलॅंडचा कर्णधार स्कॉट एडवर्डसने पाकिस्तानला पहिल्यांदा फलंदाजी दिली. पाकिस्तानच्या डावाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. सलामीवीर फखर झमान, कर्णधार बाबर आझम व इमाम उल हक यांनी साफ निराशा केली. यावेळी त्यांची स्थिती 3 बाद 38 अशी बिकट बनली होती. त्यानंतर महंमद रिझवानने सौद शकिलच्या साथीत अफलातून फलंदाजी केली व संघाचा डाव सावरला. या दोघांनीही आपापली अर्धशतके पूर्ण करताना संघाचे दीडशतक फलकावर लावले.
शकिल 52 चेंडूत 9 चौकार व 1 षटकारासह 68 धावांवर बाद झाला. पाठोपाठ रिझवानही 68 धावांवरच बाद झाला. त्याने 75 चेंडूत 8 चौकार फटकावले. ही जोडी परतल्यावर पुन्हा एकदा संघाची गाडी घसरली. ईफ्तेखार अहमद व हसन अली यांनीही साफ निराशा केली. तळात महंमद नवाज व शादाब खान यांनी उपयुक्त फलंदाजी करत संघाला द्विशतकी पल्ला पार करून दिला.
2️⃣8️⃣6️⃣ on the board 🏏@76Shadabkhan and @mnawaz94 with important contributions towards the end after 6️⃣8️⃣ each from @saudshak and @iMRizwanPak 👏#PAKvNED | #DattKePakistani | #WeHaveWeWill pic.twitter.com/WwypcIlfsI
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 6, 2023
नवाज 43 चेंडूत 4 चौकारांसह 39 धावांवर धावबाद झाला. शादाबही 34 चेंडूत 2 चौकार व 1 षटकारासह 32 धावांवर परतला. त्यानंतर हॅरीस रौफ व शाहीन शाह आफ्रीदी यांनी थोडीफार चुणुक दाखवली व संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. नेदरलॅंडकडून बास दी लीडेने सर्वाधिक 4 गडी बाद केले. कॉलिन ऍकरमनने 2 बळी घेतले. तर आर्यन दत्त, लोगन व्हॅन बीक आणि पॉल व्हॅन मीकरेन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
A sensational four-wicket haul on #CWC23 debut for Bas de Leede 👊#PAKvNED 📝: https://t.co/g7GsWb5pp6 pic.twitter.com/7qDTnlRCqn
— ICC (@ICC) October 6, 2023
दोन्ही संघांचे प्लेइंग-11 खालीलप्रमाणे –
पाकिस्तान : इमाम उल हक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ.
नेदरलँड्स : विक्रमजीत सिंग, मॅक्स ओड, कॉलिन अकरमन, स्कॉट एडवर्ड्स (विकेटकीपर/कर्णधार), बास डी लीडे, तेजा निदामनुरु, साकिब झुल्फिकार, लोगान व्हॅन बीक, रोलोफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.