ICC ODI World Cup 2023 New Zealand vs Netherlands : एकदिवसीय विश्वचषकाच्या सहाव्या सामन्यात आज न्यूझीलंडसमोर नेदरलँड्सचेे आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर चालू आहे. न्यूझीलंड संघाच्या नजरा सलग दुसऱ्या विजयावर आहेत. त्याचबरोबर नेदरलँड्सला या मोहिमेत पहिला सामना जिंकण्याचा प्रयत्न असेल. न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात इंग्लंडचा पराभव केला होता. त्याचवेळी नेदरलँड्सला पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.
शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा न्यूझीलंड संघाच्या 23 षटकांत 1 बाद 122 धावा झाल्या आहेत. 13व्या षटकात 67 धावांवर न्यूझीलंड संघास पहिला धक्का बसला. रॉल्फ व्हॅन डर मर्वेने डेव्हॉन कॉनवेला बास डी लीडेकरवी झेलबाद केले. कॉनवेने 40 चेंडूंत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 32 धावांची खेळी केली. सध्या रचिन रवींद्र हा 23*(31) आणि विल यंग 61*(67) क्रीजवर आहेत.
नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नेदरलँड्सला पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले असून या सामन्यात पराभव झाल्यास त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे.
Netherlands opt to field after winning the toss in Hyderabad 🏏
A key Kiwi pacer makes his return 👀#CWC23 | #NZvNED 📝: https://t.co/vX9LWhFX1H pic.twitter.com/0bvF5WokmU
— ICC (@ICC) October 9, 2023
न्यूझीलंडचे नेतृत्व टॉम लॅथम करत आहे. न्यूझीलंडने प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला आहे. जिमी नीशमच्या जागी लोकी फर्ग्युसनला संधी मिळाली आहे. त्याचवेळी नेदरलँड्सनेही एक बदल केला. दुखापतग्रस्त लोगान व्हॅन बीकच्या जागी रायन क्लेनचा समावेश करण्यात आला आहे.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11 खालीलप्रमाणे –
न्यूझीलंड :- डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कप्तान/कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.
नेदरलँड्स : विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ’डॉड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, तेजा निदामनुरु, स्कॉट एडवर्ड्स (कप्तान/कर्णधार), सायब्रँड एंजेलब्रेक्ट, रॉल्फ व्हॅन डर मर्वे, रायन क्लाइन, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.