World Cup 2023 Final India vs Australia Live Score Updates in Marathi : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या सहा विकेट पडल्या आहेत. सध्या मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादव क्रीजवर आहेत.
IND vs AUS Live Score : टीम इंडियाला सहावा धक्का!
मिचेल स्टार्कने टीम इंडियाला सहावा अन् मोठा धक्का दिला आहे. केएल राहुल 66 धावांवर झेलबाद झाला. 42 षटकानंतर टीम इंडियाने 6 गडी गमावून 207 धावा केल्या आहेत.
भारताचा निम्मा संघ परतला पॅव्हेलियनमध्ये…
भारतीय संघाचा निम्मा संघ 178 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. रवींद्र जडेजा 22 चेंडूत 9 धावा करून बाद झाला. जोश हेझलवूडने त्याला यष्टिरक्षक जोश इंग्लिसकरवी झेलबाद केले.
भारताला चौथा अन् मोठा धक्का…
विराट कोहलीच्या रूपाने भारताला तिसरा धक्का बसला. भारताचा महान फलंदाज विराट कोहली 29व्या षटकात बाद झाला. पॅट कमिन्सने त्याच्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर त्याला क्लीन बोल्ड केले. कोहलीने 63 चेंडूत 54 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत चार चौकार मारले. कोहली बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा मैदानावर शांतता पसरली आहे.
श्रेयस अय्यरही परतला पॅव्हेलियनमध्ये…
श्रेयस अय्यरच्या रूपाने भारताला तिसरा धक्का बसला. 11व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर तो पॅव्हेलियनमध्ये परतला. अय्यरला कमिन्सने यष्टिरक्षक जोश इंग्लिशच्या हाती झेलबाद केले. त्याला तीन चेंडूत केवळ चार धावा करता आल्या.
मॅक्सवेलनं केलं रोहित शर्माला बाद…
रोहित शर्माच्या रूपाने भारताला दुसरा धक्का बसला. 10व्या षटकातील चौथ्या षटकात तो बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलच्या चेंडूवर तो ट्रॅव्हिस हेडकरवी झेलबाद झाला. रोहित 31 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 47 धावा करून बाद झाला.
शुभमन गिल ठरला अपयशी…
शुभमन गिल विश्वचषकाच्या अंतिम फेरीत अपयशी ठरला आहे. तो पाचव्या षटकात मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर बाद झाला. लाँग ऑनवर उभ्या असलेल्या अॅडम झाम्पाने त्याचा झेल घेतला. गिलला सात चेंडूत केवळ चार धावा करता आल्या. भारताला पहिला धक्का 30 धावांवर बसला.
ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजीचा निर्णय….
तत्पूर्वी,झालेला नाणेफेकीचा कौल हा ऑस्ट्रेलिया संघाच्या बाजूनं लागला आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक (TOSS )जिंकली आहे. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, त्याने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. रोहितने सांगितले की, मी Toss जिंकला असता तर प्रथम फलंदाजीचाा निर्णय घेतला असता. दुसरीकङे ऑस्ट्रेलियन संघातही कोणताही बदल झालेला नाही.
दोन्ही संघाची Playing 11 खालीलप्रमाणे 👇👇👇
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया : ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.
दरम्यान, भारतीय संघाने चौथ्यांदा एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताने तीन वेळा एकदिवसीय विश्वचषक फायनल खेळली. यामध्ये भारताला 2 वेळा विजय आणि एकदा पराभव स्विकारावा लागला.1983 मध्ये, भारतीय संघ प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला होता, जिथे त्याने वेस्ट इंडिजचा पराभव करून प्रथमच विजेतेपद पटकावले होते.
यानंतर 2003 मध्ये भारत दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला. त्यानंतर सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारताला ऑस्ट्रेलियाकडून 125 धावांनी पराभव पत्करावा लागला.त्यानंतर 2011 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. श्रीलंकेला हरवून भारताने 28 वर्षांचा दुष्काळ संपवला होता. त्यानंतर आज भारत विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.