World Cup 2023 England vs Sri Lanka Toss & Playing 11 : विश्वचषकाच्या 25व्या सामन्यात श्रीलंकेसमोर गतविजेत्या इंग्लंडचे आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे.हा सामना दोन वाजता सुरू होईल.
या स्पर्धेत इंग्लंड आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी चार सामने खेळले आहेत. दोघांनाही प्रत्येकी एक विजय मिळाला आहे.
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून श्रीलंकेविरुद्ध फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.(Jos Buttler wins the toss and opts to bat first) संघातील तीन बदलांची माहिती त्यानं दिली.
दुखापतग्रस्त रीस टोपलीशिवाय हॅरी ब्रूक आणि गस ऍटिंकसन या सामन्यात खेळत नाहीत. ख्रिस वोक्स, मोईन अली आणि लियाम लिव्हिंगस्टोन परतले आहेत.त्याचबरोबर अँजेलो मॅथ्यूज आणि लाहिरू कुमरा यांचे श्रीलंकेच्या संघात पुनरागमन झाले आहे.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11 खालीलप्रमाणे :-
श्रीलंका : पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (wk/c), सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, अँजेलो मॅथ्यूज, महिष तिक्षना, कसून रजिथा, लाहिरू कुमारा, दिलशान मदुशंका.
इंग्लंड : जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (wk/c), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वुड.