World Cup 2023 Australia vs Pakistan Match Result : विश्वचषकाच्या 18व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 62 धावांनी पराभव केला आहे. एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव आहे. तर ऑस्ट्रेलियाचा हा सलग दुसरा विजय आहे. पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया आता चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.
बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत नऊ गडी गमावून 367 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानला 45.3 षटकात केवळ 305 धावा करता आल्या आणि सामना गमवावा लागला.
🏏 Match Summary 🏏
Pakistan fall short by 62 runs in Bengaluru.We take on Afghanistan next on Monday.#AUSvPAK | #DattKePakistani pic.twitter.com/v4Cnre6y1E
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 20, 2023
विजयासाठी 358 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून फलंदाजीत इमाम उल हकने 71 चेंडूत 10 चौकारसह 70 धावा आणि अब्दुल्ला शफीकने 61 चेंडूत 7 चौकार अन् 2 षटकारासह 64 धावा करत चांगली सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 134 धावांची भागिदारी केली. मोहम्मद रिझवान 40 चेंडूत 46 धावा करून बाद झाला. मात्र यानंतर एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही अन् पाकला पराभवाला सामोरं जावं लागलं.
ऑस्ट्रेलियातर्फे अॅडम झाम्पाने चार, पॅट कमिन्स आणि मार्कस स्टॉइनिसने प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्यामुळे पाकिस्तानचा संघ 45.3 षटकात 205 धावांवर सर्वबाद झाला आणि ते 62 धावांनी पराभूत झाले.
Pakistan are set a target of 368 🏏@iShaheenAfridi and @HarisRauf14 share eight wickets between them after 🇦🇺 openers Warner and Marsh amassed tons.#AUSvPAK | #DattKePakistani | #WeHaveWeWill pic.twitter.com/rPJLvBadbh
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 20, 2023
तत्पूर्वी, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला . या सामन्यात उपकर्णधार शादाब खान खेळत नसल्याचे त्याने नाणेफेकीदरम्यान सांगितले. शादाबच्या जागी उसामा मीरला संधी देण्यात आली. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने एकही बदल केला नाही.
सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर याच्या शानदार दीडशतकी आणि मिचेल मार्शच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने टाॅस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 367 धावा करत पाकिस्तानसमोर विजयासाठी 368 धावांचे लक्ष्य ठेवलं.
ऑस्ट्रेलियाकडून दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी शतके झळकावली. डेव्हिड वॉर्नरने 163 आणि मिचेल मार्शने 121 धावा केल्या. मार्शने 108 चेंडूत 121 धावा केल्या. यादरम्यान त्याने 10 चौकार आणि 9 षटकार मारले. वाॅर्नर 124 चेंडूत 163 धावा करून बाद झाला. त्याने 14 चौकार आणि नऊ षटकार मारले. या दोघांशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला 25 धावांचा पल्ला गाठता आला नाही.
मार्कस स्टॉइनिसने 21 धावा केल्या. जोश इंग्लिशने 13 धावांचे योगदान दिले. मार्नस लॅबुशेन आठ धावा करून बाद झाला तर स्टीव्ह स्मिथ सात धावा करून बाद झाला. पॅट कमिन्सने सहा आणि मिचेल स्टार्कने दोन धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेल आणि जोश हेझलवूड खातेही उघडू शकले नाहीत. एडन झाम्पा 1 धाव काढून नाबाद राहिला.
पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 10 षटकात 54 धावा देताना सर्वाधिक 5 बळी घेतले. आफ्रिदीने मिचेल मार्श,ग्लेन मॅक्सवेल,मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांना बाद केलं. हरिस रौफने तीन गडी बाद केले मात्र त्याने 8 षटकात 83 धावा दिल्या. उसामा मीरनेही एक विकेट घेतली मात्र त्याने 9 षटकात 82 धावा दिल्या.