दुबई – अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेतील आव्हान जरी संपले असले तरीही अन्य संघांचे क्रमवारीतील स्थान धोक्यात आणू शकत असलेल्या चेन्नई सुपर किंग्जला रोखत प्ले-ऑफमधील स्थान पक्के करण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सला विजय आवश्यक बनला आहे.
कोलकाता विरूध्द चेन्नई यांच्यातील सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पू्र्वी झालेला नाणेफेकीचा (टाॅस) कौल हा चेन्नई सुपर किंग्जच्या बाजूने लागला आहे. चेन्नईचा कर्णधार एम.एस.धोनी याने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत कोलकाता नाईट रायडर्स संघास प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे.
#CSK have won the toss and they will bowl first against #KKR#Dream11IPL pic.twitter.com/w1EwSpFG7l
— IndianPremierLeague (@IPL) October 29, 2020
दरम्यान, यंदाच्या स्पर्धेत कोलकाताने सुरुवातीच्या अपयशावर मात करत यशाच्या मार्गावर प्रवास सुरू केला. त्यांनी पहिल्या चार संघातही स्थान मिळवले होते. मात्र, अन्य संघांच्या विजय-पराजयांचे समीकरण त्यांनाही भोवले असून आज त्यांनी विजय मिळवला तर त्यांचे या गटातील स्थान निश्चित होणार आहे. तर दुसरीकडे या स्पर्धेत आता चेन्नईला गमावण्यासारखे काहीही शिल्लक नसल्याने ते अन्य संघांना धक्का देण्यासाठी सज्ज राहतील.
कोलकाताचा संघ गुणतालिकेत 12 गुणांसह 5 व्या क्रमांकावर आहे तर चेन्नईचा संघ 8 गुणांसह शेवटच्या स्थानावर आहे. कोलकाता आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांचे गुण समान असले तरी रनरेटच्या आधारे पंजाब चौथ्या क्रमांकावर आहे.