चिंबळी- जिल्हा परिषद पुणे समाज कल्याण विभागाच्या वतीने भाडेकरूची सर्व माहिती घेऊन शरद भोजन योजनेंतर्गत पोस्टामध्ये सेव्हिंग खाते उघडून रक्कम जमा करणार असल्याने चाकण परिसरातील कुरूळी, निघोजे, चिंबळी, केळगाव भागातील विविध गावांतील पोस्ट ऑफिसमध्ये भाडेकरूंची मोठ्या प्रमाणात गर्दी सुरू झाली आहे.
गेल्या एक ते दीड महिन्यापासून संपूर्ण राज्यात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य शासनाच्या आदेशानुसार सर्वत्र लॉकडाऊनची अमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे या परिसरातील सर्व कंपन्या 3 मेपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, येथील कामगारांची आणि भाडेकरूंची उपासमार होऊ नये म्हणून शरद भोजनेअंतर्गत पोष्टात खाते उघडून काही रक्कम जमा करण्यात येणार असल्याने या भागातील पोष्टात येथील भाडेकरू गर्दी करीत आहेत.