– संजय कडू
पुणे(प्रतिनिधी) – लाेणीकाळभाेर परिसरातील काेरेगाव येथे एका व्यक्तीचे घरात महिलेसह दाेघेजण बळजबरीने शिरुन सीबीआयचे अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर घरातील लॅपटाॅप, माेबाईल, माेटारीचे स्टार्टर, कागदपत्रे, बँकेचे कागदपत्रे असा मुद्देमाल घेऊन दमदाटी करत दीड लाख रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
याप्रकरणी पाेलीसांनी रेश्मा शेख (रा.लाेणीकाळभाेर,पुणे) व एक अनाेळखी इसम यांचे विराेधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मिलिंद महादेव भाेंगाळे (वय-६३,रा.काेरेगाव,पुणे) यांनी लाेणीकाळभाेर पाेलीस ठाण्यात आराेपी विराेधात फिर्याद दिली आहे.
मिलिंद भाेगाळे व रेश्मा शेखहे काेरेगाव येथे डिम्स निवारा या साेसायटीत वेगवेगळया इमारतीत राहण्यास आहे. रेश्मा शेख हिने तिचे एका साथीदारासह मिलिंद भाेंगाळे यांचे घरी जात सीबीआयचे अधिकारी असल्याची बतावणी करुन बेकायदेशीररित्या घरात घुसून तपासणी सुरु केली.
घरातील लॅपटाॅप, कागदपत्रे, माेबाईल असा 31 हजार रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने धक्काबुक्की, दमदाटी करुन त्यांनी ताब्यात घेतला. त्यानंतर भाेंगाळे यांना कार मध्ये बसवुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ व दमदाटी करत, आम्हाला दीड लाख रुपये द्या नाहीतर तुमच्यावर खाेटी केस दाखल करताे तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देवून त्यांचे अपहरण करुन त्यांना गाडीतून खेडशिवापूर येथे नेऊन साेडले. याबाबत पुढील तपास लाेणीकाळभाेर पाेलीस करत आहे.