शिक्रापूर -तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे वाढदिवसाच्या दिवशी काढलेले फोटो बदनामीच्या हेतूने सोशल मीडियावर स्टेटस ठेवल्याचा जाब विचारल्याच्या रागातून तरुणास मारहाण करण्यात आली. याप्रकरणी चार जणांवर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अक्षय शिवाजी गायकवाड (वय 25, रा. तळेगाव ढमढेरे) यांनी फिर्याद दिली. तर आमन जावेद बागवान, बुरानउद्दीन जावेद बागवान, जावेद शब्बीर बागवान व शमीम शब्बीर बागवान (चौघेही रा. तळेगाव ढमढेरे) अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.
आमन बागवान यांनी गावातील अक्षय गायकवाड यांच्या सोबत एका वाढदिवसामध्ये काही फोटो काढून बदनामीच्या हेतूने सोशल मीडियावर स्टेटस ठेवले होते.
त्यामुळे अक्षय गायकवाड यांनी त्यांना जाब विचारला त्यामुळे चिडून जाऊन आमन बागवान व त्यांच्या साथीदारांनी अक्षय यांना शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.