पिंपरी – सार्वजनिक स्वच्छतागृहात जाण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणानंतर महिलांसमोर अश्लील चाळे करणाऱ्या तरुणावर भोसरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी पहाटे शांतिनगर परिसरात घडली.
35 वर्षीय महिलेने फिर्यादी दिली असून सचिन रामदास पवार (रा. शांतिनगर, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांच्यात सार्वजनीक शौचालयाच्या येथे किरकोळ कारणावरून वाद जाले. यावरून आरोपीने सर्व महिलांसमोर अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. अद्याप आरोपी हा फरार असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.