महिलेला शिवीगाळ करुन विनयभंग

पिंपरी – घरात एकटी असलेल्या महिलेला शिवीगाळ करीत विनयभंग केल्याची घटना पिंपरी येथे दि. 24 मे रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन बाळासाहेब दत्तू पोटरे (वय- 38 रा. वाघेरे कॉलनी, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी महिला घरी एकटी असताना आरोपीने तिच्या घरी जाऊन तुझा मावस भाऊ घरी का आला होता? असे म्हणून फिर्यादीस शिवीगाळ केली व तिचा विनयभंग केला. या प्रकरणाचा अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×