वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात पावसामुळे व्यत्यय

ब्रिस्टल: विश्‍वचषक स्पर्धेपुर्वी आयोजेआत केलेल्या सराव सामन्यांपैकी वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिके दरम्यान होत असलेल्या सराव सामन्यात पावसामुळे व्यत्यय आलेला असुन अखेरचे वृत्त हाती आले तेंव्हा दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 9.3 षटकांत बिनबाद 60 धावा केल्या होत्या. यावेळी सलामीवीर हाशिम आमला नाबाद 33 तर क्विंटन डी कॉक नाबाद 21 धावांवर खेळत होते.

यावेळी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आफ्रिकेच्या संघाने सावध सुरूवात करत भागिदारी करण्यावर आपला भर दिल्याने त्यांनी सुरूवाती पासुनच सहाच्या सरासरीने धावा करायला सुरूवात केली. यावेळी वेस्ट इंडिजच्या संघाने आक्रमक क्षेत्ररक्षण लावत आफ्रिकेच्या संघावर दग्बाव वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सामना रोमांचक होईल अशी अपेक्षा सुरूवाती पासुनच प्रेक्षकांना होती. यावेळी आफ्रिकेच्या सलामीवीरांनी पहिल्या षटकात 9 धावा करत धडाक्‍यात सुरूवात केली. मात्र, दुसरे षटक टाकणाऱ्या शेल्डन कॉट्रीलने सुरूवाती पासुन भेदक मारा करत आपल्या षटकांत केवळ 4 धावा देत आफ्रिकेच्या सलामीवीरांना बांधुन ठेवल्याने आफ्रिकेच्या दोन षटकांत 413 धावा झाल्या. यानंतर होल्डर आणि कोट्रीलने टिच्चुन मारा करत आफ्रिकेच्या फलंदाजांना हात उघडण्याची जास्त संधी न दिल्याने त्यांना केवळ 5 च्या सरासरीने धावा करता येत होत्या.

मात्र, सहाव्या षटकात क्विंटन डी कॉकने कोट्रीलच्य षटकात 3 चौकारांच्या मदतीने 13 धावा करत संघाची धावगती पुन्हा वाढवली. मात्र, त्यानंतर सातत्याने आलेल्या पावसामुळे सामना थांबवावा लागला त्यावेळी आफ्रिकेने 9.3 षटकांत बीनबाद 60 धावांची मजल मारली होती.

पाकिस्तान बांगलादेश सामन्याचा टॉसही नाही

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या दरम्यान होत असलेल्या दुसऱ्या सराव सामन्यातही पावसाचा व्यत्यय आला असुन त्यामुळे दोन्ही संघातील सामन्याची नाणेफेकही झाली नाही. या दोन्ही संघांमधील पाकिस्तानसाठीचा हा अखेरचा सराव सामना असुन बांगलादेशचा पुढील सराव सामना हा भारतीय संघा सोबत येत्या मंगळवारी होणार आहे.

https://twitter.com/cricketworldcup/status/1132666706567016450

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)