पुणे – शहर पोलीस दलातील अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोन दिवसात 1 लाख 52 हजार 890 रुपयांचा हुक्का फ्लेवर त तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत. शिवाजीनगर, विमाननगरसह विविध भागातील विक्रेत्यांवर कारवाई केली आहे.
कोरेगाव पार्वै पोलीस ठाण्याच्या हद्दीत तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या मोहंम्मद अब्दुललतीफ अबुबकर (22) याच्यावर कारवाई करुन 39 हजार 200 रुपयांचा माल जप्त केला. तसेच, विमाननगर भागातील परवेज अब्दुलअली सय्यद (43) याच्याकडून 38 हजार 555 रुपये तर, शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालाजी सुपर मार्कैट, आदर्श सुपर मार्केट या दुकानांवर छापा टाकून मदनलाल परिहार (30) आणि मिश्रीलाल परमार (54) यांच्यावर कारवाई केली. त्यांच्याकडून 75 हजार 135 रुपये किमंतीचा वेगवेगळ्या कंपनीच्या सिंगारेट व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपआयुक्त बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाचे उपनिरीक्षक निलेशकुमार महाडिक कर्मचारी मगर, वांजळे, गरुड, गुरव, शिंदे, कदम, बागवान, चौधर, पडवळ, पवार, महिला पोलिस शिपाई कर्णवर यांच्या पथकाने केली.