लासुर्णे -येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी विशाल शामराव पवार (रा. बजरंगवाडी, लासुर्णे) याच्या वर गुन्हा दाखल केला आहे.
विशाल पवार याने संबंधित एका तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर गेल्या दोन महिन्यापासून वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी पवार यांच्यावर बाललैंगिक अत्याचार अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर करीत आहेत.