मुंबई – भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज खेळाडू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीहून ऋषभ घरी येत असताना त्याच्या कारला हा भीषण अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्ली-डेहराडून महामार्गावर रेलिंगला धडकल्यानंतर ऋषभच्या कारला आग लागली. त्यानंतर परिसरातील उपस्थितांनी त्याला गाडीतून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले.
या अपघातात ऋषभच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहेत. ऋषभला डेहराडूनमधील रुग्णालयात जखमी अवस्थेत दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. त्याला पुढील उपचारांसाठी दिल्लीला पाठवण्यात येणार आहे.
मात्र पंतचा अपघात झाल्याची माहिती समोर येताच उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना त्याच्या उपचारासंदर्भात विशेष निर्देश दिले आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पंतच्या अपघातानंतर अधिकाऱ्यांना त्याच्या उपचारासाठी सर्व सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले आहेत.
Cricketer Rishabh Pant met with an accident on Delhi-Dehradun highway near Roorkee border, car catches fire. Further details awaited. pic.twitter.com/qXWg2zK5oC
— ANI (@ANI) December 30, 2022
तसेच वेळ पडल्यास त्याच्यासाठी एअर अॅम्ब्युलन्सचीही सेवा पुरवा असे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितलं आहे. दरम्यान, सध्या ऋषभ पंतची प्रकृती स्थिर असून, त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.