कडूस – खिल्लार गाय महाराष्ट्राचे भूषण समजले जाते. देशी गोवंश वाढवावा, महाराष्ट्रात खिल्लार गायींच्या संगोपनाला चालना मिळावी, देशी गोपालनाकडे इतरांचे लक्ष वेधण्यासाठी कावडे यांनी खेड तालुक्यातील कडूस जवळील आगरवाडी येथे सामाजिक कार्यकर्ते शंकर रघुनाथ कावडे यांनी लक्ष्मी गायीच्या डोहाळे जेवणाचे आयोजन केले होते.
लक्ष्मी गायीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात प्रासंगिक गाणी गात गात महिलांनी ओटी भरण्याचा कार्यक्रम राबविला. 70 सुवासिनीनीं गायीला ओवाळून गोड पक्वान्न खाऊ घातले. डोहळ्याची प्रासंगिक गाणी म्हटली गेली.
या उपक्रमाची कडूस परिसरात निकोप चर्चा झाली. अरूण अरगडे,भरत चिपाडे, रंगनाथ अरगडे, हिरामण अरगडे, तुषार कावडे,संजय अरगडे,मंथन अरगडे, सुरेश जाधव, नंदाताई धायबर यांच्या सहकार्याने आणि कावडे कुटुंबातील महिलाच्या पुढाकाराने , पाहुण्यांना निमंत्रण देऊन, त्यांच्या गोड जेवणाची व्यवस्था उत्तमरीत्या करून,जेवण डोहाळे कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.