Coronavirus India : नवीन व्हेरिएंट मुळे वाढली चिंता; 24 तासांत 415 जणांचा मृत्यू, 8 हजार नवीन रुग्ण

नवी दिल्ली – जगासह भारतातही करोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे चिंता वाढली आहे. करोनाचा ‘ओमायक्रॉन’ हा नवीन व्हेरियंट मिळाला आहे जो की आधीच्या व्हेरियंटपेक्षा धोकादायक असल्याचे जानकारांकडून सांगण्यात आले आहे. असे असताना आज देशात गेल्या 24 तासांत 8 हजार 603 नवीन करोना रुग्णांची भर पडली आहे. तर 415 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या 99 हजार 974 झाली आहे. त्याचबरोबर या साथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 70 हजार 530 झाली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 3 कोटी 40 लाख 53 हजार 856 लोक करोनामुक्त झाले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.