जालना – जालऩ्यात कोविड रुग्णालयात नातवाईकाच्या बिलावरून झालेल्या वादात रुग्णलयात दगडफेक करत रुग्णालयाची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये रुग्णालयातील एक कर्मचारी जखमी झाला आहे. नूतन वसाहत परिसरात असलेल्या नवजीवन हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवजीवन हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या आपल्या नातवाईकाच्या बिलावरून रितेश चौधरी याचा हॉस्पिटलमधील मेडिकल चालकासोबत सुरुवातीला वाद झाला होता. या वादाचे रुपांतर बाचाबाचीमध्ये झाले. त्यानंतर रितेश याने आपल्या अन्य् 2 साथीदारांना घेऊन रुग्णालयात आला आणि रुग्णालयावर जोरदार दगडफेक करत तोडफोड केली. यामध्ये मेडिकलची तोडफोड झाल्याने मोठा नुकसान झाले आहे. या घटनेत हॉस्पिटलमधील एक कर्मचारी जखमी झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रितेश चौधरी यास ताब्यात घेतले व त्याच्या अन्य दोन साथिदाराचा शोध सुुरु आहे.
ही जालना शहरातील दुसरी घटना आहे. करोना काळात आपल्या जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या डॉक्टर आणि पोलिसांना अशी वागणूक देणे योग्य नसल्याचे पोलीस निरीक्षक महाजन यांनी यावेळी सांगितले आहे.