Congress Announced Candidate list – काँग्रेस पक्षाने राज्यातील उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. जालना आणि धुळे या दोन लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार जालना येथून डाॅ. कल्याण काळे (Dr kalyan kale) यांना तर धुळ्यातून डॉ. शोभा बच्छाव (Dr shobha bachhav) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
धुळे लोकसभेसाठी शेवटच्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. येथे भाजपकडून डाॅ. सुभाष भामरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर जालना लोकसभेसाठी 13 मे रोजी मतदान पार पडणार आहे. येथे भाजपकडून रावसाहेब दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही मतदारसंघात काॅंग्रेस विरुद्ध भाजप अर्थात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना पहायला मिळणार आहे.