मुंबई: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणीच्या सुनावणीला गैरहजर राहण्यासाठी केलेला प्रज्ञासिंह ठाकूर यांचा अर्ज सोमवारी एनआयए न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे या आठवड्यात भाजपच्या नव्या खासदारांना आरोपी म्हणून न्यायालयात हजेरी लावणे अनिवार्य झाले आहे.
हा अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील एनआयए न्यायालयाचे न्या. पाडाळकर यांनी फेटाळून लावला आहे. सोमवारच्या सुनावणीत साध्वी वगळता लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितसह मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील अन्य सर्व आरोपींनी हजेरी लावली होती.