नवी दिल्ली – करोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउनचा अनेक जणांना फटका बसला. त्यात चित्रपट सृष्टीतील कलाकारांचाही समावेश आहे. भोजपूरी चित्रपटांत काम करणाऱ्या एका कलाकारालाही त्यामुळे नुकसान सहन करावे लागले.
मात्र या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी त्याने चक्क बनावट नोटांचाच व्यापार सुरू केल्याचे उघडकीस आले आहे.
मोहम्मद शाहिद उर्फ राजा हे त्या कलाकाराचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या तडाख्यातून बाहेर पडण्यासाठी त्याने अगोदर गाड्या चोरण्याचे काम सुरू केले. त्यानंतर चक्क बनावट नोटा छापण्याचा उद्योग सुरू केला.
तो आणि त्याचे साथिदार या बनावट नोटा बाजारात खपवत होते. त्यांच्याबाबत माहिती मिळाल्यानंतर कारवाई करत त्यांना अटक करण्यात आली असून या लोकांकडून 50 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.