रायपूर – देशभरात करोना लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे. अशातच करोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही छत्तीसगडमधील जिल्हाधिकारी करोना पाॅझिटिव्ह आढळ्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे करोना लसीकरण मोहीमेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
छत्तीसगडच्या जाजगीर भागाचे जिल्हाधिकारी यशवंत कुमार हे गुरूवारी करोना पाॅझिटिव्ह आढळले आहेत. त्यांनी स्वत: सोशल मीडियाद्वारे माहिती दिलीय. आपल्या संपर्कात आलेल्यांनी करोना चाचणी करून घेण्याचेही त्यांनी आवाहन केले आहे.
आएएस अधिकारी यशवंत कुमार यांनी करोना लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन करोनाचे दोनही डोस घतले होते. दुसरा डोस घेतल्यानंतर दोनच दिवसांनी ते करोना पाॅझिटिव्ह असल्याचे समोर आले. मात्र, यशवंत कुमार यांच्यामध्ये करोनाची कोणतीही लक्षणं आढळली नव्हती.
Got COVID positive today. Please do COVID test yourself who came in contact with me
— Yashwant Kumar IAS (@Yashias) March 11, 2021
यशवंत कुमार यांनी 8 फेब्रुवारीला करोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर 8 मार्ज रोजी दुसरा डोस घेतला. त्यानंतर तीन दिवसांनी त्यांची अॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली. त्यात ते करोना पाॅझिटिव्ह आढळले. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी कुटुंबीयांचीही तपासणी करून घेतली. मात्र, सर्व कुटुंबीय निगेटीव्ह आहेत.
दरम्यान, यशवंत कुमार यांनी करोना लसीकरण मोहीमेत सहभागी होऊन सर्वांनी लस घेण्याचे आवाहन केले होते. मात्र, आता स्वत: कुमारच करोना पाॅझिटिव्ह आढल्यानंतर करोना लसीकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे.