मुंबई : कोरोनामुळे संपूर्ण जगावर अगोदरच एक संकट आले असताना आता याच विषाणुच्या नव्या प्रकारामुळे ब्रिटनमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पहिल्या कोरोना विषाणूच्या आघातातून जग सावरत नाही तोच काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या नव्या प्रकाराबाबत ब्रिटनने साऱ्या जगाला सावध केले होते.
View this post on Instagram
यामुळेच विदेशात लागू करण्यात आलेल्या सक्तीच्या लॉकडाऊनमुळं अनेक बडे सेलिब्रिटी तिथं अडकल्याचं वृत्त आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा, आफताब शिवदासानी या बॉलिवूड सेलिब्रिटींचं परदेशात अडकल्याचं वृत्त समोर येत आहे. “सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता संतोष जुवेकरसुद्धा इंग्लंडमध्ये अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली.
View this post on Instagram
दरम्यान, ब्रिटनहून प्रवासाला आतापर्यंत चाळीस देशांनी बंदी लावली आहे. यात युरोपातील संघ एक कॉमन पॉलिसी बनवण्यावर विचार करीत आहे. डेन्मार्कमध्ये देखील एका नव्या करोना व्हायरसचं प्रकरण समोर आलं आहे. ज्यात स्वीडनने डेन्मार्कहून प्रवास करण्यास बंदी लावली आहे. व्हायरसचा एक नवा विषाणू जास्त वेगाने संक्रमण फैलावणारा आहे, पण तो अनकंट्रोल आहे, असं नाही. तो कंट्रोल होण्यासारखा असा दिलासा देणारी बातमी आहे.