पुणे – राज्यात करोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. पुण्यातही दररोज रूग्णवाढीचा आकडा हा वाढताच आहे. गेल्या 24 तासात पुण्यात तब्बल 1805 नवे पाॅझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 5 जणांचा शहरात करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शहरात रात्री 10 नंतर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.
पुण्याच्या लॉकडाऊनसंदर्भात मोठा निर्णय; जाणून घ्या काय चालू, काय बंद?
आज दिवसभरात 8 हजार 602 करोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 1805 जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तर 598 रूग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात सध्या 341 रूग्ण अत्यावस्थ असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, शहरातील एकूण करोनाबाधित रूग्णांची संख्या आता 2 लाख 14 हजार 830 झाली आहे. तर आतापर्यंत 2 लाख 165 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या शहरात 9 हजार 740 सक्रिय रूग्ण आहेत. आतापर्यंत पुणे शहरात करोनामुळे 4925 जणांचा मृत्यू झाला आहे.