लोणी काळभोर -मास्क न वापरणे तसेच सोशल डिस्टंन्सिंगचे नियम न पाळण्याचा परिणाम हवेली तालुक्यात दिसू लागला आहे. दिवसेंदिवस करोनाचा आलेख वाढत जात असल्याचे निदर्शनास येत आहे. शुक्रवारी 127 बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर 75 जण करोनावर मात करून घरी परतले आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी दिली.
आजच्या 127 बाधितांमुळे एकूण रूग्णसंख्या 18 हजार 61 झाली. तर करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या 16 हजार 960 झाली आहे. आज अखेर एकूण मयतांची संख्या 356 झाली आहे. मृत्यूदर 1.97 टक्के आहे. आज 747 जणांवर उपचार सुरू असून त्यापैकी 6 जण अत्यवस्थ आहेत. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.90 टक्के आहे.
तालुक्यातील गावनिहाय उपचार घेत असलेले कोरोना बाधित रूग्ण पुढीलप्रमाणे- वरदाडे गोऱ्हे खुर्द, गुजर निंबाळकरवाडी, कोंढणपूर, कल्याण, भिलारवाडी, नायगांव, न्यू कोपरे, शिंदवणे प्रत्येकी 1, वडाची वाडी, श्रीरामनगर, कुुुडजे, कोरेगावमूळ, टिळेकरवाडी, खडकवासला, फरसुंगी, शिरसवडी, अष्टापूर, सांगवी सांडस प्रत्येकी 2, वळती, मांजरी खुर्द, भिवरी, डोणजे, मांगडेवाडी, फुलगांव, वढू खुर्द प्रत्येकी 3, आळंदी म्हातोबाची, खानापूर प्रत्येकी 5, पेरणे, बकोरी प्रत्येकी 7, कुंजीरवाडी, कोलवडी प्रत्येकी 8, कोंढवे धावडे 9, सोरतापवाडी 10, खेड शिवापूर 11, किरकटवाडी 15, आव्हाळवाडी 18, केसनंद 21,
कदमवाकवस्ती 33, देहू 35, मांजरी बुद्रुक 38, लोणी काळभोर 44, नांदेड 53, नऱ्हे 72, वाघोली 211 यासंदर्भात अधिक माहिती देताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ सचिन खरात म्हणाले की नागरिकांनी आवश्यक ती सर्व काळजी न घेतल्याने रूग्णसंख्येत वाढ होत असताना दिसत आहे. तालुक्यातील नागरिक मास्क न वापरता फिरत असताना दिसत आहेत. ही धोकादायक बाब आहे.
यांचेवर कारवाई करण्याची जबाबदारी पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनावर सोपवण्यात आली आहे. यापुढील काळात धडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे अवाहन त्यांनी केले आहे.