मुंबई –बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये लोकप्रिय कॉमेडियन जॉनी लिव्हर यांची मुलगी जॅमी लिव्हर सोशल मीडियावर आपल्या कॉमेडीने नेहमीच चर्चेत असते. ती आपल्या हटके अंदाजामुळे नेहमीच फॅन्सच्या मनात घर करून जाते. सोशल वरील तिच्या सक्रियतेमुळे नेटकरी नेहमीच कॉमेडीला दाद देत असतात.
View this post on Instagram
२०१२मध्ये जॅमीच्या करिअरची सुरूवात स्टॅंडअप कॉमेडियन म्हणून झाली होती. जॅमीने ‘किस किस को प्यार करूं’ आणि ‘हाऊसफुल ४’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘हाऊसफुल ४’ मध्ये तिने गिगलीची भूमिका साकारली होती.
View this post on Instagram
यातच सोशलवर नेहमीच पोस्ट करणाऱ्या जॅमीने पुन्हा एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये जॅमी लोकप्रिय गायिका आशा भोसले यांची मिमिक्री करताना दिसत आहे. या व्हिडीओत जॅमी आशा भोसले यांची मिमिक्री करत म्हणते, “नेहा कक्कडचा भाऊ टोनी आहे ना त्याला मी टोनू बोलते, त्याची गाणी मस्त असतात, चला ऐकूया…मिल्कशेक ऐकलं आहे. आता तर प्रोटीन शेक पण आलं आहे.
View this post on Instagram
या व्हिडियोमध्ये ती पुढे म्हणते, हे बूटी शेक काय आहे?” हे म्हणत जॅमी टोनीला चिडवताना दिसते. हा व्हिडीओ शेअर करत जॅमीने “हे कोणतं शेक आहे?” असा प्रश्न कॅप्शनमध्ये टोनी कक्करला टॅग करत विचारला आहे. जॅमीने आणखी एक कॉमेडि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.