वेल्हे -साखर (ता. वेल्हे) येथील 68 वर्षीय महिलेचा बुधवारी (दि. 8) करोनाने मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी दिली. वेल्हे तालुक्यातील हा करोनाचा पहिला बळी आहे. कोळवडी येथे बाधिताचे वास्तव्य झाले होते, त्यामुळे येथील चार जणांची तपासणी करण्यात आली असून, त्यात एकाला संसर्ग झाला आहे. इतर तिघांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
वेल्ह्यातील डॉक्टर दामपत्यास करोनाची लागण झाली असून, त्यांची नोंद पुणे शहरात केली आहे. करोनाच्या महाभयंकार संकाटाशी रात्रंदिवस झटणारा खरा करोनायोद्धा असलेल्या डॉक्टर पती-पत्नीला लागण झाली असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. तालुक्यातील करोनाग्रस्तांची आतापर्यंतच संख्या 38 झाली असून, त्यातील 34 रुग्ण बरे झाले आहेत.