नागरगाव येथील 70 वर्षीय महिलेचा मृत्यू
मांडवगण फराटा- नागरगाव (ता. शिरूर) येथील 70 वर्षीय करोना संसर्गीत महिलेचे शुक्रवारी (दि. 24) सकाळी उपचारादरम्यान निधन झाले, अशी माहिती निमोणे आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ.इंदिरा डॅनियल यांनी दिली.
नागरगाव येथील 70 वर्षीय महिलेला सर्दी, खोकला, तापाचा त्रास होत असल्याने त्यांना (दि. 10) जुलै रोजी तळेगाव दाभाडे येथील खासगी दवाखान्यात दाखल केले होते. त्यावेळी महिलेस करोनाची लक्षणे दिसत असल्याने त्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. त्यात त्यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तळेगाव दाभाडे येथील खासगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कोविड अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. शुक्रवारी (दि. 24) सकाळी त्यांचा मृत्यू झाला, असे डॉ. डॅनियल यांनी सांगितले.