Madness Machayenge Show | ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय शोने मागील काही वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यानंतर आता या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या शोमुळे यातील कलाकारांना मोठी लोकप्रियता मिळाली. यातील अभिनेता कुशल बद्रिके सध्या सोनी टीव्हीवरील ‘मॅडनेस मचाएंगे’ या कार्यक्रमात पाहायला मिळत आहे.
त्याच्यासोबत हेमांगी कवी आणि गौरव मोरे हे कलाकार मंडळी देखील आहेत. यामध्ये आता ‘चला हवा येऊ द्या’ या शोमधून पोस्टमनच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता सागर कारंडेची एन्ट्री झाली आहे.
View this post on Instagram
‘मॅडनेस मचाएंगे’ या कार्यक्रमाचा सोनी टीव्हीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये सागरची झलक पाहायला मिळत आहे. यात सागसह गौरव दुबे आणि स्नेहील मेहरा देखील दिसत आहेत. सध्या त्याच्या या प्रोमोला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे. तसेच चाहत्यांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव देखील होत आहे. Madness Machayenge Show |
दरम्यान, सागरची ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातील अनेक पात्र गाजवली. भावनिक पत्र वाचून दाखवणारे पोस्टमन काका, खोचक पुणेरी बाई या त्याच्या भूमिका विशेष लोकप्रिय ठरल्या. परंतु ‘चला हवा येऊ द्या’ संपण्यापूर्वीच त्याने हा शो सोडला होता. त्यानंतर आता सागर हिंदी कार्यक्रमात पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. Madness Machayenge Show |
हेही वाचा:
भाजप उमेदवारावर दगडफेक, घटनास्थळावरून पळून जीव वाचवला ; ‘या’ राज्यात झाला हल्ला