भुवनेश्वर: ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी कोरोना वॉरियर्ससाठी मोठी घोषणा केली आहे. नवीन पटनायक म्हणाले की, कोरोना विषाणूच्या युद्धात लढणार्या कोरोना योद्ध्यांचा मृत्यू झाल्यास त्यांना शहीद दर्जा देण्यात येईल. त्यांच्यावर राजकीय सन्मान देऊन अंत्यसंस्कार केले जातील.
नवीन पटनायक यांनी कोरोना वॉरियर्सना 50 लाख रुपयांचा विमा देखील जाहीर केला आहे. पटनायक म्हणाले की, कोरोनाविरूद्ध लढ्यात प्राण गमावलेल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना (खासगी व सार्वजनिक) तसेच इतर आवश्यक सेवांच्या सदस्यांना 50 लाख रुपये देण्यात येतील. भारत सरकारच्या पुढाकाराने राज्य सरकार हे सुनिश्चित करेल.
State will treat them as martyrs & provide state funeral with state honors. A detailed scheme of awards will be instituted recognizing their unparalleled sacrifice.These awards will be given on national days: Odisha CM Naveen Patnaik https://t.co/nzOtF0lo2E
— ANI (@ANI) April 21, 2020
नवीन पटनायक म्हणाले की, कोरोना योद्धांना मरण आल्यास राज्य सरकार हुतात्मा मानेल आणि त्यांचे अंत्यसंस्कार राजकीय सन्मानाने केले जातील. त्यांचे बलिदान लक्षात घेऊन एका पुरस्काराचेही नियोजन केले जात आहे. हे पुरस्कार राष्ट्रीय दिनी देण्यात येतील.
याशिवाय आरोग्य कर्मचार्यांवर होणारा कोणताही हिंसाचार ही राज्याविरूद्ध कृत्य आहे, असा इशारा त्यांनी दिला. जर कोणतीही व्यक्ती त्यांच्या कामात अडथळा आणल्यास किंवा त्यांना अडचणीत आणत असेल तर त्यांच्याविरूद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या तरतुदींसह कठोर फौजदारी कारवाई केली जाईल.