पुणे – करोना प्रतिबंधक लसीचे सोमवारी कोवॅक्सीन आणि कोविशील्ड दोन्ही लस उपलब्ध करून देण्यात आले असून, दोन्ही मिळून 68 केंद्रांवर लसीकरण होणार आहे. कोविशील्ड लस ही 62 केंद्रांवर तर कोवॅक्सीन ही लस 6 केंद्रांवर उपलब्ध असणार आहे.
कोवॅक्सीनचे प्रत्येक केंद्रांवर 200 तर कोविशील्डचे 100 डोस उपलब्ध असतील. 18 वर्षावरील सर्व नागरिकांना कोविशील्डच जो पहिला डोस मिळणार आहे त्यातील 40 टक्के लस ऑनलाइन बुकींग करून तर 20 टक्के लस ही ऑन दि स्पॉट नोंदणी करून मिळेल.
तर कोवॅक्सीनचा जो पहिला डोस मिळणार आहे त्यातील 20 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून तर 20 टक्के ऑन दि स्पॉट नोंदणी करून मिळेल.
18 एप्रिलपूर्वी पहिला डोस घेतलेल्या 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना सोमवारी 20 टक्के लस ऑनलाइन बुकींग करून तर 20 टक्के ऑन दि स्पॉट दुसरा डोस दिला जाईल. तर 13 जूनला कोवॅक्सीनचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे.
त्या 18 वर्षांवरील नागरिकांना सोमवारी 40 टक्के लस ऑनलाइन बुकींगद्वारे तर 20 टक्के लस ही ऑन दि स्पॉट नोंदणी करून मिळेल. दिव्यांग आणि गरोदर महिलांनाही ऑन दि स्पॉट नोंदणी करून प्राधान्याने लस दिली जाईल.